गावाविषयी माहिती
पालखेड मिरची हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक प्रभू श्री.राम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. पालखेड मिरची गावात दक्षिणमुखी दोन हनुमान मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे तसेच काशीविश्वेश्वर महादेव मंदिर पालखेड गावच्या मनकर्णिका नदीच्या तीरावर असून तेथे दररोज भाविक दर्शनास येतात आणि पालखेड गावाच्या मधोमध खंडोबा महाराज मंदिर आहे दरसाल येथे मोठी यात्रा भरते खूप मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहतात तसेच पालखेड मिरची गावात दोन शनि महाराज मंदिरे आहेत , सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ६३३७ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ३, अंगणवाडी केंद्रे ९ व व्यायामशाळा १,सभामंडप-६ प्राथमिक आरोग्य केंद्र ,खाजगी हॉस्पिटल अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच गावात अहिल्याबाई होळकर यांचे पुरातन बारव असून तसेच २५ मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
पालखेड मिरची गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ऊस, द्राक्ष, कांदा, सोयाबीन व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. द्राक्ष ऊस कांदा या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते,तसेच दुग्ध व्यवसाय करतात
पालखेड मिरची ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पालखेड मिरची गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान मध्ये पालखेड मिरची ला विशेष गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासन पुरस्कुत तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत सन २०१३-२०१४ पारितोषिक प्राप्त गाव बक्षीस रुपये-४ लक्ष रुपये प्राप्त झाला असून स्वच्छता अभियान पुरस्कारही जिल्हा व तालुका पातळीवर मिळाला आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व १४ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
पालखेड मिरची गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.
भौगोलिक स्थान
पालखेड मिरची हे गाव निफाड तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १४ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य क्षेत्रफळ १४८३ हे आर असून ग्रामपंचायतीमध्ये ५ वार्ड आहेत. एकूण ८९६ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या ६३३७ आहे. त्यामध्ये ३५४८ पुरुष व २७८९ महिला यांचा समावेश होतो.
गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे.तसेच गावालगत अवघ्या १ किमी पालखेड डावा कालवा पाट जात असून रोटेशन मध्ये ज्यामुळे पिकांना पाणीपुरवठा होतो . येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३९°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १५°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.
पालखेड मिरची गाव द्राक्ष कांदा ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध असून परिसरात पाणलोट क्षेत्राचा विकास झाल्यामुळे जलसंधारणाची चांगली सोय आहे.
लोकजीवन
पालखेड मिरची गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून द्राक्ष, ऊस, कांदा, मका व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, यामध्येही कार्यरत आहेत.
गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.
येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
पालखेड च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.
संस्कृती व परंपरा
पालखेड मिरची गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.तसेच गावात दक्षिणमुखी मारुती दोन मंदिरे आहे काशीविश्वेश्वर महादेव मंदिर ,खंडोबा मंदिर , गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व सप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.
गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.
गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.
स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.
यामुळे सोनगाव गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.
प्रेक्षणीय स्थळे
ग्रामदैवताचे मंदिर – गावातील प्रमुख जागृत दक्षिणमुखी मारुती मंदिर,काशिवेश्वेश्वर महादेव मंदिर ,खंडोबा महाराज मंदिर गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी सप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
बारव – गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे पुरातन काळातील अहिल्याबाई होळकर बारव ग्रामस्थांच्या भेटीगाठींचे केंद्र असते.
शेती क्षेत्र व द्राक्षबागा – पालखेड मिरची द्राक्ष उस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गावातील हिरवीगार शेते, द्राक्षबागा आणि उसाची शेती पाहण्याजोगी आहे.
जवळची गावे
पालखेड मिरची गाव निफाड तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे पालखेड मिरची सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.
आहेरगाव ,लोणवाडी, दावचवाडी,कुंभारी,रानवड,नान्दुर्डी,वावी,गोरठाण,शिरवाडे हि गावे पालखेड मिरचीच्या आसपासची प्रमुख गावे आहेत.